चांदवड– भारतीय जनता पार्टीने सोमवारी वीज बिलाची होळी सकाळी करुन आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्यांनी सांगितले की, लॉकडाऊन मध्ये ठाकरे सरकारने जनतेला वाढीव वीजबिल पाठवून शॉक दिला. त्यात या सरकारने बिलात सवलत भेटेल म्हणून आश्वासन दिले. पण आता त्यांचे ऊर्जामंत्री म्हणतात की , ‘ वीजबिल ‘ भरावेच लागेल. हे सरकार महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात करून भुलभुलया करीत असल्याचे सांगितले. सरकारने दिलेला शब्द पाळावा व वीज बिल कमी करावे अशी आमची मागणी आहे.
यावेळी विद्युत बिलाबाबत बोलतांना सांगितले की, विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन केले असता . सदरच्या बिलात या महिन्यापासून समायोजित आकार व वहन आकार याची भर टाकलेली दिसून येत आहे . म्हणजेच मागील बीलाच्या एकूण ३५ ते ४० टक्के वीजबिलात वाढ झालेली आहे .वीज वितरण कंपनीने अचानक हे आकार वाढवून सामान्य विज ग्राहकांना नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे . या विरोधात आवाज उठवून भाजपने आंदोलन केले आहे.
हे आंदोलन भारतीय जनता पार्टी चादंवडच्या वतीने आमदार डॉ . राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थतीत करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता आव्हाड व चांदवड चे तहसीलदार पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मा.डॉ नितीन गांगुर्डे, मोहन शर्मा, अशोक व्यवहारे, बाळासाहेब वाघ, आशोक भोसले, सुनील शेलार, पंढरीनाथ खताळ विक्रम बाबा मार्कंड, मनोज जगन्नाथ शिंदे, अॅड शांताराम सुभाषराव भवर ,प्रशांत ठाकरे, भाऊराव देवरे,मनोज बांगरे,उमेश काळे ,गणेश महाले ,किशोर क्षत्रिय,योगेश ढोमशे,राजाभाऊ आहिरे,महावीर संकलेचा, सुभाष पुरकर, पिंटू भोईटे, महेश खंदारे, बाळा पाडवी, विजय धाकराव, राहुल हंडगे, गणेश पारवे, प्रकाश पवार, आत्माराम खताळ, विशाल ललवाणी, विशाल शिंदे, अंबादास ठोंबरे सरपंच, संजय पाचोरकर, देवढे सर, मुकेश आहेर, रोशन क्षत्रिय, संकेत वानखेडे, यांनी आंदोलनात सहभाग घेतला.