चांदवड- चांदवडचे प्रथम नगराध्यक्षपद भूषणविणारे भूषण कासलीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चांदवड नगरीच्या विकासासाठी, उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा ‘चांदवड भूषण’ पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.
समाजासाठी सकारात्मक कार्य करणाऱ्या या व्यक्तींच्या कार्याची विशेष दखल घेतली गेली तर त्यातून प्रेरणा घेऊन भविष्यातही पुढे अशी अनेक व्यक्तिमत्वे तयार होतील व आदर्श चांदवड घडविण्यात त्यांचेही सहकार्य प्राप्त होईल. म्हणूनच चांदवड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी आपल्या जन्मदिनानिमित्त अशा नागरिकांना “चांदवड भूषण” म्हणून सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये जेष्ठ साहित्यीक व कादंबरीकार डॉ.राजेंद्रजी मलोसे, श्रीमती कलावती वसंतलालजी गुजराथी, .अब्दुल जब्बार तांबाट, .ऍड.के.एल.पाटणी, जेष्ठ पत्रकार व ग्रंथमित्र केशवराव काका कोतवाल, स्व.शकुंतलाभाभी जवाहरलालजी आबड,सुभाष भागुजी निकम,रामदास यशवंत पंडीत, हिरामण दामू शेळके,बाळासाहेब गणपत शेळके, कवी व चित्रपट गीतकार विष्णू थोरे, श्री.गंगाधर सोनवणे, चंद्रभान गांगुर्डे, गोबा देवमन शिंदे, अरुण शिवाजी तासकर,रामदास दगडू क्षत्रिय, अशोक कापडीया, संगीतकार राधेश्याम चव्हाण, अक्षदा शिंदे, इमरान मौलाना मुशरथ खान, राजाराम मोतीराम खैरनार, बाळासाहेब होनराव,रतन बडोदे, बाळासाहेब कबाडे, देवीदास शिवराम हिरे, गायक श्रीनिवास दत्तात्रय सोनवणे, गायक व संगीतकार योगेश खंदारे, कवी रवींद्र देवरे, कवी रावसाहेब जाधव, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त समाजसेवक अशोक काका व्यवहारे यांना “चांदवड भूषण” म्हणून सन्मानित करण्यात आले.
चांदवडच्या विकासात भर घालणाऱ्या या मान्यवरांच्या सन्मानाने नव्या पिढीतील तरुण कलावंतांना,उद्योजकांना व व्यायासायिकांना प्रेरणा मिळेल व भविष्यात गावाच्या प्रगतीत व लौकिकात नव्याने वाढ होईल असे मत चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भुषण कासलीवाल यांनी व्यक्त केले.