नाशिक – चांदवड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिक्षक शरद बबनराव जगताप यास अवघअया ३०० रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. शिंगवे शिवारातील शेतीच्या मोजणीच्या नकला आणि शासकीय फीची पावती देण्यासाठी जगताप याने ३०० रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार ब्युरोने सापळा रचला. त्यात जगताप हा ३०० रुपये घेताना रंगेहाथ पकडले गेला. त्यामुळे जगतापला तत्काळ अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लाच घेणे किंवा देणे हा गुन्हा आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.