चांदवड – गेल्या अनेक वर्षांपासून चांदवडच्या ग्रामीण आरोग्य विभागास वातानुकूलित शवपेटी मिळावी अशी मागणी होत होती. अनेक पत्र देऊनही ती पूर्ण झाली नाही. परंतु चांदवडचे जेष्ठ नागरिक विनायक शिवराम थोरे यांनी त्यांच्या पत्नी कै. सुमन थोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामीण रुग्णालयास वातानुकूलित शवपेटी दान देऊन मोठी उणीव भरून काढली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णू पालवे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या उपस्थितीत शवपेटी ग्रामीण रुग्णालयास भेट देण्यात आली.
याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक अशोक व्यवहारे, नगराध्यक्ष जगन राऊत,बाळासाहेब शेळके, माधवराव पाटील, लक्ष्मण लुटे, माणिक थोरे, मीना थोरे, अविनाश थोरे, सीमा थोरे, नवनाथ आहेर, रवी आहिरे, अल्ताफ तांबोळी, संदीप उगले, सुनील बागुल, दीपक शिरसाठ, अनिल कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विष्णू थोरे यांनी केले.