नाशिक – चांदगिरी शिवारात दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे. मंगळवारी (११ ऑगस्ट) पहाटे बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले. ८ ते ९ वर्षांची ही मादी आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दारणा नदी काठी बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एक बिबट्या जेरबंद केल्यानंतर आता दुसरा बिबट्याला पकडण्यातही यश आले आहे.