मुंबई – महिंद्रा अँड महिंद्रा ग्रृपचे चेअरमन आनंद महिंद्रा नेहमीच त्यांच्या सोशल मिडीया पोस्टवरून चर्चेत असतात. आनंद महिंद्रा अश्या लोकांना प्रमोट करतात जे कमी साधनांमध्ये स्वतःचे जगणे समृद्ध करतात. त्यांनी आता अशीच एक पोस्ट ट्विटरवर केली आहे. या पोस्टमध्ये आटोरिक्षाला आलिशान घरात रुपांतरित करणाऱ्या व्यक्तिची त्यांनी माहिती दिली आहे.
चेन्नईत राहणाऱ्या या व्यक्तिचे नाव अरुण प्रभू आहे आणि त्यांनी आपल्या आटोला अश्या घरात रुपांतरित केले आहे ज्यात साधारण घरातील सर्वच सोयीसुविधा आहेत. या घरात भरपूर जागा आहे, व्हेंटिलेशनची व्यवस्था आहे आणि खिडकी तसेच दरवाजेही आहेत.
एवढेच नव्हे तर टेरेस आणि कपडे वाळविण्याची व्यवस्थाही आहे. हे एक मोबाईल घर आहे. आनंद महिंद्राने पोस्टमध्ये म्हटले आहे की आनंद प्रभू नावाच्या व्यक्तिने केवळ १ लाख रुपयांत हे घर तयार केले आहे. हे घर कुठेही घेऊन जाता येऊ शकते.
या घराच्या छतावर अरुणने सोलर पॅनल्सही लावले आहे आणि काही बॅटरिजही ठेवल्या आहेत ज्यातून घरात वीज पुरवठा होऊ शकेल. विज जोडणीशिवाय अरुणने हे सिद्ध केले आहे. अर्थात एका साध्या घरात ज्या सुविधा मिळतात त्या सर्व अरुणच्या घरात आहेत. या घरात पाणी साठवून ठेवण्याचीही सोय आहे, हे विशेष.
आनंद महिंद्रांनी पोस्ट शेअर करताना लिहीले आहे की, ‘अरुणने या प्रयोगाद्वारे कमी जागेतील समाधान अधोरेखित केले आहे. कोरोनानंतरच्या काळात फिरस्तीची हौस असलेल्या लोकांसाठी हा एक मोठा ट्रेंड ठरू शकतो. अरुणने बोलेरो पिकअप टॉपवर असे काही तयार केले तर मला जास्त आनंद होईल.’
https://twitter.com/anandmahindra/status/1365543615464808448