बगदाद (इराक) – जगात आश्चर्यकारक घटनांची कमतरता नाही. दररोज जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे काहीतरी असे घडत असते जे ऐकल्यावर आपल्या भुवया उंचावतात. आता इराकमध्ये चक्क तीन लिंग असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य तर सोडाच, डॉक्टरही हैराण झाले आहेत.
डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून दोन अतिरिक्त लिंग हटविले आहेत. कारण तीनपैकी केवळ एकच लिंग क्रियाशील होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर माहिती पडले होते की बाळाला दोन अतिरिक्त लिंग वाढत होते. त्याच जागेच्या आसपास हे घडत असल्यामुळे डॉक्टरांनाही काय करावे समजत नव्हते.
सुरुवातीला त्यांच्यासाठीही हे सारेच नवीन होते. एक–दोन हजार नव्हे तर तब्बल ५० किंवा ६० लाख मुलांमागे एखाद्यामध्ये अश्याप्रकारची घटना बघायला मिळते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जगात शंभरहून अधिक मुलांचा जन्म अश्याच पद्धतिने झाल्याचे नोंदविण्यात आले आहे, हे विशेष.
सुरुवातीला अंडकोषातील सूज वाढत असल्याने मुलाचे पालक त्याला दवाखाण्यात घेऊन आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना ही बाब उघडकीस आली. असेच एक प्रकरण भारतात पुढे आले होते. तीन लिंग असलेल्या मुलाचा जन्म झाला होता. मात्र मेडीकल जर्नलमध्ये त्याची नोंद झाली नाही त्यामुळे पहिली घटना म्हणून त्याकडे बघण्यात आले नव्हते.