१ ) आपण देखील कर्ज घेण्याचा विचार करत असल्यास या प्रक्रियेचे पालन करू शकतो. त्याकरिता टोल फ्री नंबरचा आधार घेऊ शकतो, म्हणजे एसबीआयच्या टोल फ्री क्रमांक 1800112018 यावर कॉल करू शकतो. आणि गृह कर्जासाठी अर्ज करू शकतो.
२ ) ‘होम’ लिहून देखील 567676 वर संदेश पाठवू शकतो. त्यानंतर बँक अधिकारी आपल्याशी संपर्क साधतील. त्याशिवाय आपण वेबसाइटवरून अर्ज करू शकतो. ३ ) गृह कर्जासाठी अर्ज करण्यासाठी घर खरेदीदार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या www.Homeloans.Sbi च्या अधिकृत संकेतस्थळालाही भेट देऊ शकतो. येथे आपण कर्जासाठी अर्ज करू शकतो.
४ ) बँकेकडून गृहकर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसेच
वेबसाइटबद्दल माहिती, दस्तऐवज आणि कर्जासाठी असलेल्या अटींविषयी माहिती देण्यात येते. याकरिता योनो अॅप देखील उपयुक्त आहे.
५ ) आपण गृह कर्जासाठी Google Play वरून योनो हे अॅप डाउनलोड करून देखील अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आपल्याला आपला लॉगिन आयडी तयार करणे आवश्यक आहे.
६) यानंतर आपल्याला येथे इंस्टा लोनचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला होम लोनचा पर्याय मिळेल.
विशेष म्हणजे भारतीय स्टेट बँक कडून महिलांना गृह कर्जाच्या व्याजदरावर एसबीआय 0.05 टक्के सूट देत आहे.