नवी दिल्ली – कोविड-१९च्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितिच्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या एका वर्षाच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याच्या निर्णयाला आज लोकसभेमध्ये एका विधेयकाद्वारे संमती मिळाली. खासदारांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन सुधारणा विधेयक २०२० कालच लोकसभेत मांडण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्रिमंडळानं ६ एप्रिल रोजी या संबंधी वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला होता. आता सुधारित विधेयकाद्वारे ही वेतन कपात लागू राहणार आहे.