आग्रा (उत्तर प्रदेश) – जिल्ह्यातील चंबळ नदीच्या खोऱ्यात सध्या अनोखे दृष्य दिसत आहे. लखनऊच्या कुकरेल प्रजनन केंद्रात जन्मलेल्या ३५ सुसर किंवा मगर (१२ नंदगवा, ११ सहसों, १२ महुआ सुडा घाट) येथे सोडण्यात आल्या आहेत. चंबळ नदीच्या खोऱ्यात सध्या सुसरींची संख्या २२११ इतकी झाली आहे. चंबळ खोऱ्यातील बालू इथून सुसरींचे अंडे लखनऊच्या कुकरेल प्रजनन केंद्रात नेण्यात आले होते. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात २१७६ सुसर आढळल्या होत्या.
बाह इथले रेंजर आर के सिंह राठोड म्हणाले, जवळपास तीन वर्षांच्या देखरेखीनंतर सुसरींची उंची १२० सेमी. झाल्यावर त्यांना नदीत सोडण्यात आलं. एक ते दीड महिन्यापर्यंत त्या नदीच्या किनारी वावरतील. त्यानंतर खोल पाण्यात जातील.
सुसर आणि मगरींचे अभ्यासक जैलाबुद्दीन यांच्यानुसार, कुकरेल प्रजनन केंद्रात चंबळहून आणलेली अंडी देखरेखीखाली ठेवली जातात. सुसर कोणत्या वातावरणात राहू शकता याचं संशोधन केलं जातं. सुसरी वयस्क झाल्यानंतर त्यांना चंबळ नदीच्या खोर्यात सोडलं जातं.
चंबळ नदीच्या किनारी वाळूममध्ये सुसर मादी अंडे देते. तिथून अंडी एकत्रित करून कुकरेल प्रजनन केंद्रात नेले जातात. देखरेखीदरम्यान अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. जवळपास तीन वर्षांपर्यंत त्यांना मासे खिलवून वाढवलं जातं.
जगभरात सुसरींची संख्या कमी होत आहे. जवळपास ८० टक्के सुसर चंबळ नदीच्या खोर्यात आढळतात. प्रत्येक वर्षी त्यांची संख्या वाढत आहे. मागील गणनेत १,८७६ सुसर आढळल्या होत्या. १९७९ पासून चंबळ नदीत सुसरींचे संरक्षण केलं जात आहे. आता त्यांची संख्या २२११ पर्यंत वाढली आहे.