शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चंद्रपूरमध्ये १९९५ पेक्षा भीषण पूर; अनेक गावे पाण्याखाली

by India Darpan
सप्टेंबर 4, 2020 | 4:06 pm
in राज्य
0
IMG 20200901 WA0037

चंद्रपूर – मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे पाच मीटरपर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील हजारो हेक्टर धान शेतीसह अनेक गावे पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १९९५ पेक्षाही पुराची पातळी भीषण आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वत: ब्रह्मपुरी व सावली भागाची सतत तीन दिवस बोट व हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच विस्थापित झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

आपद्ग्रस्तांना भांडी व कपड्यांसाठी पाच हजार रुपये व अन्नधान्यासाठी पाच हजार रुपये याप्रमाणे प्रति कुटुंब दहा हजार रुपये प्रारंभिक तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यानी सांगितले. पहिले पाच व नंतर पाच असे एकूण १० हजार रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहे.

पूरग्रस्तांना ही प्राथमिक मदत असली तरी सर्व्हेअंती भरीव मदत देण्यात येणार आहे. यात १०० टक्के घरे पडलेल्यांना ९५ हजार रुपये, घराच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, शेतीच्या नुकसानकरिता प्रति हेक्टर १८ हजार रुपये, जनावरे मरण पावल्यास त्याची वेगळी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील बोरगाव, पारडगाव, बेटाळा, कोलारी, भालेश्वर, नवरगाव, बेटगाव, अहेर, रनमोचन तर सावली तालुक्यातील करोली, निमगाव, बोरमाळा या गावांसह पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची, पडलेल्या घरांची पाहणी केली व आपदग्रस्त नागरिकांसोबत, शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधला.

पूरग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून तातडीने प्रत्यक्ष सर्व्हेक्षण व पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सर्व गावा-गावात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्व्हेक्षण व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

पुरामुळे गावागावात गाळ साचला असल्याने गाळ तातडीने काढून ब्लिचिंग पावडर टाकण्याचे व आपादग्रस्त गावात तातडीने आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिले.

सर्व्हेक्षण करीत असताना कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन प्रत्यक्ष तपासणी व पंचनामे करून अहवाल तयार करावा. या पुरात मत्स्यपालन, कुक्कुटपालन यांचे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून त्यांचासुद्धा उल्लेख करण्यात यावा अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी सभापती विजय कोरेवार, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार सागर कांबळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, तालुका कृषी मंडळ अधिकारी रामाराव वाघमारे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावचे सरपंच तसेच खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर, विलास निखार, नितीन उराडे, देवीदास जगनाडे, नानाजी तुपट, हितेंद्र राऊत, दिनेश चिटनूरवार, यशवंत बोरकुटे, उर्मिलाताई तरारे उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खुषखबर! नाशकात घर खरेदीवर शून्य टक्के स्टॅम्प ड्युटी; नरेडकोचा मोठा निर्णय

Next Post

राज्याचे नवे क्रीडा धोरण लवकरच

Next Post
DCM Sports Meeting 1140x570 1

राज्याचे नवे क्रीडा धोरण लवकरच

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011