नाशिक – येथील बळी मंदिर परसरातील रासबिहारी स्कुलच्या पाठीमागील बाजुस असलेले चंदनाचे झाड तोडून पळवण्याचा प्रयत्न फोल ठरला. सकाळच्या वेळेत अज्ञातांनी झाड तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, झालेल्या आवाजामुळे स्थानिकांनी बाहेर येताच चोरांची तारांबळ उडाली. या प्रकरणी हितेश रमेश मराठे यांनी तक्रार दाखल केली आहे. रविवारी सकाळी दोन अज्ञातांनी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या चंदनाचे १५ फुट उंचीचे झाड करवतीने कापून असल्याचे त्यांनी पाहिले. संबंधित बाब निदर्शना येताच मराठे यांनी आरडा ओरड केल्याने चोरटयांनी तेथून पलायन केले.