फरीदकोट (पंजाब) – सध्या येथे सुरू असलेल्या हॉर्स ब्रीडर्स स्पर्धेत अहमदाबाद येथून एक काळ्या रंगाचा उमदा घोडाही आला आहे. परमवीर नामक या घोड्याची किंमत आहे तब्बल १ कोटी. अभिनेता सलमान खान याला हा घोडा पसंत पडला असून त्यासाठी १ कोटी मोजण्याची तयारी आहे. पण, या घोड्याच्या मालकाने याला नकार दिला आहे. हा घोडा या स्पर्धेत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
अहमदाबाद येथील भैंसडा स्टड फार्मचे मालक रंजीत सिंह राठोड हे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्याकडील दोन घोडे घेऊन तेथे पोहोचले. या प्रवासाला त्यांना २६ तास लागले. या परमवीर नामक घोड्याची जात मारवाडी असून ऊंची ६५ इंचाहूनही अधिक आहे. गेल्यावर्षी देखील रिलायन्स ग्रुपला हा घोडा पसंत पडला आणि त्यांनी यासाइी १ कोटी मोजायची तयारी ठेवली होती. पण तेव्हाही राठोड यांनी याला नकार दिला होता.
डाएटसाठी एवढा खर्च
या स्पर्धेत परमवीरच्या राहण्याची तसेच खाण्याची विशेष सोय आहे. परमवीरच्या रोजच्या खाण्यावर जवळपास १८०० ते २ हजार रुपयांचा खर्च होतो. मंगळवारी झालेल्या दोन दातांच्या स्पर्धेत परमवीरने एक लाखांचा पुरस्कार पटकावला.
