नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या जनकपुरी भागात, नवरदेव लग्नाच्या मिरवणुकीत घोड्यावरून जात असताना त्याच्या गळ्यातील नोटांची हार आणि सोन्याची साखळी घेऊन तीन चोरटे पळून गेले.
गेल्या ४८ तासांत दिल्लीतली ही दुसरी घटना आहे, दुचाकीवरील चोरट्यांनी घोड्यावरील वरांना (दोन नवरदेवांना) लक्ष्य केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये वराबरोबर उपस्थित असलेले लोक नाचण्यात आणि गाण्यात व्यस्त होते. पहिली घटना तिमारपूरमध्ये घडली, यात उत्तर दिल्लीच्या तिमारपूर भागात दोन बदमाशांनी घोडीवर बसलेल्या वराच्या नोटांची माळ हिसकावून नेली. काही समजण्याआधीच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. आरोपींविषयी अद्याप काहीही कळू शकलेले नाही.
दुसऱ्या एका घटनेत जनकपुरी येथील बॅंक्वेट हॉलमध्ये विवाह सोहळा होणार होता. रात्री १०.१५ वाजता मिरवणूक बॅनक्वेट हॉलमध्ये जाण्यासाठी निघाली, तेव्हा तिन्ही चेन स्नॅचर्सनी संधी साधून वराच्या गळ्यातील नोटांची माला चोरली, हे चोरटे एवढ्यावरच थांबले नाही, तर या बदमाशांनी वधूच्या गळ्यातील सोन्याची चेनही हिसकावली. यानंतर सर्व बदमाश फरार झाले. सर्व आरोपींना ओळखण्यासाठी सध्या घटनास्थळाभोवती लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज शोधले जात आहेत.