– एक जण जागीच ठार ८ गंभीर जखमी तर १२ जणांना दुःखापत
– घटनास्थळी सभापती सोमनाथ जोशी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांची धाव :
– एस एम बी टी रुग्णालयाकडून तात्काळ सेवा उपलब्ध
घोटी – इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील नगर -नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या म्हैसवळण घाटात गुरुवार १ सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान २५ बिगारी कामगारांना नाशिककडे घेऊन येणारी एम एच ०४ ई जी ८३७८ या गाडीवरील चालक ज्ञानेश्वर नावडकर यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने २५ बिगारी कामगारांसह ट्रक घाटातील सरंक्षण भिंत तोडून दरीत कोसळला. या अपघातात एक जण जागीच ठार ,८ गंभीर जखमी तर १२ जणांना मोठी दुखापत झाली आहे.ही माहिती समजताच घटनास्थळी इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी,सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे,भूषण डामसे,शाम निसरड यांना कळताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य चालू केले त्याक्षणी एस एम बी टी ग्रामीण रुग्णालयाकडून तात्काळ रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या.व पोलीस प्रशासनाला तात्काळ माहिती कळविण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की गुरुवारी एकच्या दरम्यान खिरविरे येथे ठेकेदार ज्ञानेश्वर नावडकर चालकासह २५ बिगारी कामगारांची ४०७ गाडी एम एच ०४ ई जी ८३७८ टेम्पो खिरविरे येथे एका आश्रम शाळेचा बांधकामाचा स्लॅब भरण्यासाठी साहित्यासह गेला होता. स्लॅब बांधकाम पूर्ण करून सायंकाळी नाशिककडे येत असतांना नाशिक-नगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या म्हैसवळण घाटात हा अपघात झाला. २५ बिगारी कामगारांसह बांधकाम स्लॅबच्या साहित्यासह हा टेम्पो पूर्ण भरलेला होता. जास्त वजनाच्या वस्तू असल्याने व येतांना वळणाच्या उतारावर असलेला म्हैसवळण घाटात सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान टेम्पो चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. लोड असलेल्या गाडीचा वेग आवरता आला नसल्याने घाटातील नाशिक जिल्हा हद्दीच्या वर नगर अकोले हद्दीतील घाट वळणात टेम्पो घाटातील सरंक्षण भिंत तोडून जवळपास तीस चाळीस फूट खोल अंतरावर कोसळला.
या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर आठ गंभीर तर १२ जण जखमी झाले. एका तीन चार वर्षीय लहान मुलांसह चार जण सुखरूप बचावले.या अपघातात बिगारी कामगारांमध्ये खोडाळा मोखाडा येथील दोन जोडपे तर एक युवतीसह,तीन महिलांचा समावेश आहे.सदर भीषण अपघाताची माहिती अकोले परिसरात कामानिमित्त गेलेले इगतपुरी पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी व टाकेद येथील सामाजीक कार्यकर्ते राम शिंदे, भूषण डामसे,शाम निसरड यांना कळताच सर्वांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.तात्काळ रुग्णवाहिकासह घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना संपर्क करून ही सविस्तर माहिती सोमनाथ जोशी व राम शिंदे यांनी संपर्क करून कळविली व घटनास्थळी मदत केली.
या अपघातात दरीत कोसळलेल्या टेम्पोतून सर्व कामगारांना रेस्क्यू करून प्रसंगावधान राखत घाटातील रस्त्यावर सर्व अपघातग्रस्त कामगारांना दरीतून सुखरूप वर आणण्यात सभापती सोमनाथ जोशी,काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते भूषण डामसे,सामाजीक कार्यकर्ते राम शिंदे, शाम निसरड,गजानन परदेशी,एस एम बी टी ग्रामीण रुग्णालयातील डॉ गोरख शिंदे,पोपट कुलाळ,गोरख काकडे,यशवंत चांदगीर आदींना रात्री आठ वाजेपर्यंत एक तासाभरात बचावकार्यात यश आले व तात्काळ सर्व कामगारांना एस एम बी टी रुग्णालयाशी संपर्क करून सर्वांनी घटनास्थळी पाच सहा रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या.
सर्व रुग्णवाहिकेतून तात्काळ एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.ही माहिती कळताच काही वेळातच घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे,पोलीस उप निरीक्षक एस पी काकडे,पोलीस कॉन्स्टेबल संतोष दोंदे,गायकवाड आदींनी घटनास्थळी पोहचून अपघातातील ४०७ टेम्पोला राजूर पोलीस ठाण्याशी संपर्क करून क्रेन बोलावून मदतकार्य सुरू केले.दरम्यान घटनास्थळी एस एम बि टी रूग्लायाकडून तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने व अपघातातील सर्वांना एस एम बी टी रुग्णालयात अपघात विभागात डॉ बागडे,डॉ सूरज कडलग यांच्या सर्व टीम ने तात्काळ उपचार सेवा दिल्याने व घटनास्थळी रुग्णवाहिका मदत कार्य दिल्याने सभापती सोमनाथ जोशी यांच्यासह सामाजीक कार्यकर्ते राम शिंदे,भूषण डामसे,शाम निसरड,जगदीश डगळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.