मुलींसाठी तलवार बाजी व मार्शल आर्टचे प्रशिक्षण
घोटी -विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी आज ग्रामपंचायत मोडाळे, माध्यमिक विद्यालय व महिला बालविकास यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थीनींसाठी स्व संरक्षणासाठी तलवारबाजी, दांडपट्टा,मार्शल आर्टस्, जुडो,बॉक्सिंग, लाठीबाजी, कराटे, याचे प्रशिक्षण काही दिवसांपासून देण्यात येत आहे या प्रशिक्षणातून मुली काय शिकत आहेत हे प्रात्यक्षिका द्वारे दाखवण्यासाठी आज या कार्यक्रमाचे करण्यात आले होते.
घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक मुलींनी अतिशय उत्कृष्ट रित्या प्रात्यक्षिक केले. ते करत असतांना त्याच्या चेहऱ्यावर असलेला आत्माविशास ओसंडून वाहत होता. प्रशिक्षण मुलींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास मिळवून देते.असे मत या वेळी उपस्थित गोरख भाऊ बोडके यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोरख बोडके हे होते त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी मोडाळे गावाची निवड केल्याने मोडाळे ग्रामपंचायतीतर्फे पूर्ण टीम चे आभार मानण्यात आले.
या प्रसंगी मुख्यद्यापक चंद्रभागा तुपे, मुख्यद्यापक जगदीश मोरे, , सरपंच मंगला बोंबले, उपसरपंच अंजना बोडके,ग्रामसेवक नाना खांडेकर ,प्रकल्प अधिकारी मा. वाकडे सर, कुलथ मॅडम, ह. भ. प . संस्था आणि विश्र्वकिरण महिला विकास संस्था सौ भामरे ,अंगणवाडी सेविका ,आशा ताई ,सर्व महिला बचत गट प्रतिनिधी , उपस्थित होते