घोटी – मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उप जिल्हाध्यक्ष संदीप संदीप कीर्वे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यात स्वाक्षरी मोहिम अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपला पाठिंबा दर्शविला. या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन मनसेचे सागर गवारी यांनी केले होते. यावेळी उप जिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, तालुका महिला आघाडीच्या पूनम राखेचा, तालुका अध्यक्ष मुलचद भगत, इगतपुरी शहराध्यक्ष सुमित बोधक, मनविसे उपजिल्हा प्रमुख गणेश उगले, मनविसे तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, उपसरपंच विजय दराणे, घोटी शहर उपाध्यक्ष राजू राखेचा, राज जावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेचा प्रसार व्हावा व तिला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दरवर्षी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येते. आपली मराठी बोली टीकावी तिचा सन्मान व्हावा म्हणून याची सुरुवात स्वाक्षरी पासून झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी दिली.
दोन गुजराती एकत्र आले तर ते गुजराती मध्ये बोलतात दोन कन्नड एकत्र आले तर ते कन्नड मध्ये बोलतात मग आपण देखील अन्य कुठल्या भाषेमध्ये न बोलता आपल्या मायबोलीतच बोलले पाहिजे असे किर्वे यांनी सांगितले. यावेळी वाहतूक सेना तालुकाध्यक्ष कृष्णा भगत, जनार्दन गतीर, संतोष बिन्नर, भगवान कवटे, अर्जुन कर्पे, रतन शेलार, मयूर मटाले, धिरज गौड आदींसह शेकडो मन सैनिक उपस्थित होते.