घोटी – वन विभागातील कर्तव्यदक्ष वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ रामदास जाधव ( वय ४४ ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. नाशिक जिल्हा वन कर्मचारी संस्थेचे चेअरमन आणि पदोन्नत वनपाल संघटनेचे ते राज्य पदाधिकारी होते. टाकेद येथे कार्यरत असतांना त्यांनी बिबट्याच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या टोळीला मोठ्या शिताफीने अटक केली होती. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील वनविभागामध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे.