नाशिक : घोटी येथील दारूदुकानावर एक्साईज विभागाने टाकलेल्या छाप्यात बेकायदा मद्यसाठा मिळून आला आहे. दुकानातील तीन कर्मचा-यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. संशयीतांना इगतपुरीच्या प्रथम वर्ग न्यायालयाने उद्या रविवार (दि.२०) पर्यंत एक्साईज कस्टडी सुनावली आहे.
युवराज मधुसिंग परदेशी (४७ रा.वाकी घोटी,ता.इगतपुरी),मुकेश रामदास गांगुर्डे (२८ रा.जेलरोड,ना.रोड) व भालचंद्र गोपीनाथ भागडे (३६ रा.नांदगाव सदो ता.इगतपुरी) अशी कोठडी सुनावलेल्या संशयीतांची नावे आहेत. घोटी ता.इगतपुरी येथील श्रीराज वाईन्स या दारू दुकानावर छापा टाकण्यात आला होता. यात १ लाख ९४ हजार ८४४ रूपये किमतीचा देशी दारूचा साठा बेकायदा मिळून आला होता. एक्साईज विभागाने केलेल्या निरीक्षणात हा मद्यसाठा वाहतूकीचा परवाना नसतांना मिळून आल्याचे समोर आले आहे.