सॅनिटायझर हॅन्डवॉश,मास्कचा पुरेपूर वापर करा : ग्रामपंचायतचे ग्रामस्थांना आवाहन
घोटी : राज्यात नाशिक जिल्हा कोरोनाचे हॉटस्पॉट होत असतांनाच शहरी भागातील कोरोना बधितांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे यापाठोपाठच सध्या कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत दिसत असतांनाच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देखील कोरोना बाधित रुग्णाचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील एकमेव प्रमुख बाजारपेठ आणि मध्यवर्ती केंद्र असलेल्या ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद बु येथे दोन दिवसांत नुकतेच सात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासनासह ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली,दरम्यान कोरोना बधितांमध्ये दोन शिक्षक असून ते कोविड शिल्ड लसीकरण घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता कोरोना तपासणी अहवालात सदर रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.
टाकेद येथील नवीन आयोध्या नगर मध्ये एकूण सात कोरोना बाधित रुग्ण आरोग्य सेविका बी. एन. सोनवणे यांचा तपासणीत सापडले आहेत. कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ सदर भाग कोरोना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून संपूर्ण परिसर बंद ठेवला आहे.ध्वनी लहरींच्या माध्यमातून दवंडी देऊन संचारबंदी लागू करण्यात आली.या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन आठवड्यांपासून टाकेद बुधवार देखील आठवडे बाजार कडेकोट बंद ठेऊन ग्रामपंचायत प्रशासनाकडून जनता करफ्यु पाळण्यात आला आहे.या टाकेद बंद ला सर्व ग्रामस्थ नागरिक व्यापारी दुकानदार वर्गाने देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला.या बंद मध्ये घराबाहेर एकही ग्रामस्थ फिरतांना दिसला नाही.
संपूर्ण टाकेद बाजारपेठ बंद होती गावातील सर्वच रस्ते ओस पडले होते.दरम्यान टाकेद क्षेत्री स्थानिक ग्रामस्थांसह शेजारील व बाहेरून टाकेद बाजारपेठेत येणाऱ्या ग्रामस्थ नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासनाने आवाहन केले आहे.आरोग्य विभागाकडून प्रभागनिहाय थर्मल तपासणी सह कोरोना अँटीजण तपासणी केल्या जात आहे.कोणीही टाकेद गावात विणामास्क प्रवेश करणार नाही.विना मास्क गावात संचार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.ग्रामपंचायत सूचनांचे सर्वांनी पालन करावे.कामाव्यतिरिक्त कोणीही गावात संचार करू नये,घरातच रहा सुरक्षित रहा,सर्वांनी प्रत्येकाची सुरक्षितता काळजी घ्यावी,सामाजिक भान राखावे, सोशल डीस्टन्सिंग ठेवत विनाकारण जास्त समुदाय एकत्र येऊन गर्दी करू नये असे ग्रामपंचायत टाकेद बु च्या सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे,उपसरपंच रामचंद्र परदेशी,ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे,ग्रामपंचायत सदस्य विक्रम भांगे,सतिष बांबळे, केशव बांबळे, डॉ श्रीराम लहामटे,ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई शिंदे,पौर्णिमा भांगे,लता लहामटे, कविता धोंगडे,रोहिणी नांगरे,भीमाबाई धादवड,आरोग्य सेविका बी. एन. सोनवणे,पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड, मदतनीस,अंगणवाडी सेविका,यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सतिष जाधव,सागर दवंडे, लालमन नांगरे,किशोर पवार,सुभाष मेमाणे,आदींनी केले आहे.
…
ग्रामस्थांनी काळजी घ्यावी
“यंदाच्या महाशिवरात्री यात्रा बंद काळापासून टाकेद आठवडे बाजार कडेकोट बंद आहे.नुकतेच काही कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सदर परिसर कोरोना प्रतिबंधीत जाहीर करून सील केला आहे ग्रामपंचायत कडून सर्व परिसारत जंतुनाशक रोगप्रतिबंधक औषध फवारणी केली आहे.ग्रामस्थांनी मास्कचा वापर करावा व काळजी घ्यावी
– सौ ताराबाई रतन बांबळे, सरपंच ग्रामपंचायत टाकेद बु.
….
ग्रामपंचायतला सहकार्य करा
“ग्रामस्थांनी घाबरून न जाता मास्क हँडवॉश चा पुरेपूर वापर करावा विनामास्क कोणीही फिरणार नाही,कामाव्यतिरिक्त घराबाहेर जाऊ नये घरीच रहा सुरक्षित रहा आणि सुरक्षितता राखा ग्रामपंचायतला सहकार्य करा”
– रामचंद्र परदेशी , उपसरपंच टाकेद बु
….