घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ व तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या घोटी ग्रामपालिकेच्या प्रभारी सरपंच पदी रामदास भोर यांची निवड करण्यात आली. घोटी ग्रामपालिकेचे सरपंच सचिन गोणके हे रजेवर गेल्याने प्रभारी सरपंच म्हणून निवडीसाठी आज ग्रामपालिका कार्यालयात बैठक झाली. या बैठकीतच विद्यमान उपसरपंच रामदास भोर यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, गणेश गोडे, संजय जाधव, रवींद्र तारडे भास्कर जाखेरे, सौ स्वाती कडू, सौ अरुणा जाधव, सौ सुनीता घोटकर, सौ रुपाली रुपवते, सौ वैशाली गोसावी, सौ सुनंदा घोटकर, सौ मंजुळा नागरे,श्रीमती अर्चना घाणे,श्रीमती कोंड्याबाई बोटे, आदींसह ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे आदींनी या निवडीचे स्वागत केले.