घोटी – मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला परिसरातील गोंदे फाटा येथील शर्मा किचन व हरी ओम धाब्यावर बाहेरच्या बाजूने वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. हॉटेलमध्ये जेवणास परवानगी नसतांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासत स-हासपणे या दोन्ही हॉटेलकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र होते.. विशेष म्हणजे शेजारी प्रख्यात असलेले ओल्ड प्रभू ढाबा व प्रभू का ढाबा हे दोन्ही हॉटेल शासनाच्या सूचना लक्षात घेऊन बंद असतांना हरीओम ढाबा व शर्मा किचन यांच्यासाठी शासनाचे काहीच नियम नाही का असा प्रश्न निर्माण येथील स्थानिकांनी उपस्थितीत केला आहे.
विशेष म्हणजे मुंबई आग्रा महामार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी हे हॉटेल असून ग्रामपंचायतने देखील दोन दिवसांपूर्वी जनता कर्फ्यू केल्यानंतर आज शासनाच्या आदेशाने सर्व हॉटेल मधून फक्त पार्सलसेवा देण्यात येईल असे जाहीर केले. त्यानंतरही हॉटेलात प्रवाशी व नागरिकांना स-हासपणे टेबल खुर्चीवर जेवण दिले जात होते. गोंदे परिसरातील शर्मा किचन व हरी ओम ढाबा कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.