घोटी – गेल्या दोन दशकापासून घोटी येथील गिर्यारोहक टीम अर्थात कळसुबाई मित्र मंडळाचे कार्यकर्ते गेल्या दोन दशकापासून नवरात्रात दररोज कळसुबाई शिखरावर जाऊन दर्शनाचा योग साधतात. यावर्षीही ही परंपरा खंडित न करता शासन नियमांचे पालन करून कळसुबाई शिखरावर जाऊन घटस्थापना केली. गिर्यारोहक टीमचे प्रमुख भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी रोज पहाटे घोटी येथून जात कळसुबाई शिखरावर सालाबाद प्रमाणे विधिवत पूजन करून घटस्थापना केल. सोशल व फिजिकल डिस्टिंगशन पालन, मास्क लावून तसेच सॅनिटायझर या त्रिसूत्रीची अमलबजावणी करून आपली परंपरा अबाधित ठेवली. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे आज दुसऱ्या माळेला कळसुबाई देवीच्या मुखवट्यावर सूर्याची प्रकाशकिरणे येत असल्याचा योग साधत या युवक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या उपक्रमात भगीरथ मराडे ,बाळू आरोटे ,विकास जाधव, काळू भोर,प्रवीण भटाटे, पंढरीनाथ दुर्गुडे आदींनी सहभाग घेतला.