घोटी – इगतपुरी तालुक्यातील आडवन ग्रामपंचयताच्या उपसरपंच श्रीमती उपसरपंच ज्योती संदीप शेलार यांनी शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमण हे बेकायदेशीर आहे. या कारणावरून श्रीमती ज्योती शेलार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी हा निकाल दिला आहे.
इगतपुरी तालुक्यातील आडवन येथील उपसरपंच यांनी गावठाणातील गट नंबर ७९४ मध्ये अनधिकृत पणे अतिक्रमण केले होते. त्यामुळे उपसरपंच ज्योती संदीप शेलार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत गावातील शासकीय जागेत अतिक्रमण केले होते. याविरोधात गावातीलच गोटीराम लक्ष्मण शेलार यांनी हरकत घेऊन प्रशासनकडे तक्रार केली होती. दरम्यान याबाबतची तक्रार अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे ही केली होती. या तक्रारी अर्जावर सूनावणी होऊन तक्रारदाराने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरण्यात आले. यानुसार नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज-३) अन्वये विवाद अर्ज मान्य करून आडवनचे उपसरपंच श्रीमती ज्योती शेलार यांचे उपसरपंच पद व सदस्यपद अपात्र केले. त्यांच्या उर्वरित कालावधीसाठी हे पद अपात्र ठरविले आहे .यावेळी तक्रारदार गोटीराम शेलार यांच्या वतीने यांच्यावतीने ऍड राजेश आर बेजेकर यांनी काम पाहिले
अतिक्रमण करणे हे चुकीचेच
शासनाच्या मालमतेत आपल्या पदाचा गैरवापर करत अतिक्रमण करणे हे चुकीचेच आहे. त्यामुळे आमच्या गावातील गोटीराम शेलार यांनी ही बाब उघडकीस आणून त्यांची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. सर्व पुरावे बघून शासनाने त्यांचे उपसरपंचपद व सदस्यपद अपात्र केले असून शासनाच्या या निर्णयाचे आम्ही ग्रामस्थ स्वागत करतो.
योगेश शेलार (ग्रामस्थ)
—
निर्णयाचे स्वागत
आडवन ग्रामपंचायत मधील गट नंबर ७९४ मध्ये उपसरपंच ज्योती शेलार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत शासकीय जागेत अतिक्रमण केले आहे मात्र ग्रामस्थांच्या वतीने याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली व त्यात सर्व पुरावे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सादर केल्याने शासनाने त्यांचे पद आपत्र केले त्यामुळे शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत आहे.
आनंदा डाके (माजी उपसरपंच)