दोन ग्राहकांच्या बॅगा लांबवल्या, दोन लाखांच्या रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवली
घोटी – इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी स्टेट बँक व युनियन बँकेच्या समोरून बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांचे बॅगा हातोहात लांबीविल्या या घटनेत एका ग्राहकाचे एक लाख ५५ हजार रुपये तर दुसऱ्या ग्राहकांचे ४५ हजार रुपये असे दोन लाख रुपये लंपास झाले या घटनेमुळे खातेदार नागरिक व व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत वृत्त असे की, घोटी बाजारपेठेतील जुन्या महामार्गवर अनेक राष्ट्रीयकृत बँका व खाजगी वित्तीय संस्था असल्याने या बँका मध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमानात गर्दी असते गेल्या काही महिण्यात atm कार्ड ची अदलाबदल करून ग्राहकांची फसवणूक, सायबर गुन्हे, भुरट्या चोऱ्या आदी प्रकार घडले त्यात दोन दिवसांपूर्वी ६ रोजी, जवळपास सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया व युनियन बँक या बँकांच्या बाहेर अज्ञात चोरट्यांनी दोन ग्राहकांच्या पैशाच्या बॅगा लांबीविल्या युनियन बँकेच्या बाहेर टेबलावर महेश जनार्दन चौधरी हा युवक बँकेत भरणा करण्यासाठी आला व भरणा स्लिप भरत असताना काऊंटरवरच ठेवलेली काळ्या रंगाची बॅग चोरट्याने लांबवली या बॅगेत जवळपास १ लाख ५५ हजार ८५० रुपये होते याच वेळी जवळच समोर असलेल्या स्टेट बँकेच्या बाहेर गर्दीचा फायदा घेत खडकेद येथील एका युवकाचे ४५ हजार रुपये रक्कम असलेली बॅग ही लांबवली या घटनेने बँकेत भरणा करणाऱ्या ग्राहकांचे धाबे दणाणले आहे. या घटना शनिवारी असलेल्या आठवडे बाजराच्या दिवशी घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.