वडाळागावात होरपळून महिलेचा मृत्यू
नाशिक : वडाळागावात घरामध्ये सॅनिटायझर मारत असताना ते मेणबत्तीवर पडले आणि अचानक पेट घेतल्याने गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रजबीया शाहिद शेख (रा. मेहबुबनगर, वडाळागाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या २० जुलै रोजी रात्री वीज नसताना, घरात मेनबत्ती लावली होती. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजबिया शेख या घरात सॅनिटायझर मारत असताना, त्यावेळी सॅनिटायझर मेणबत्तीच्या संपर्कात आले व अचानक सॅनिटायझरने पेट घेतला. यामध्ये शेख या ९० टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना, उपचारदरम्यन २४ जुलैला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीसात नोंद करण्यात आली आहे.