घरात सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर या ११ महत्त्वाच्या टिप्स ध्यानी ठेवाव्यात…
१. वास्तूमध्ये एकाच खोलीत शेजारील अथवा समोरासमोरच्या भिंतींना एकमेकांच्या विरोधी रंग देऊ नये.
२. वास्तूचे सीलिंग ROOF हे आकाश तत्वाचे प्रतिनिधी असल्याने तेथे गडद रंग देऊ नये.
३. वास्तूच्या मुख्य हॉलमधील टेबलवर शक्यतो ईशान्य कोपर्यात ROSE QUARTZ प्रकारातील स्फटिक खड्यांनी बनवलेले झाड ठेवावे.
४. वास्तूमधील नळ ठिबकत असल्यास त्वरित बंद करावे.
५. कोणताही दरवाजा करकर वाजत असल्यास त्यावर तेल सोडून आवाज बंद करावा.
६. टॉयलेट बाथरूममधील खिडकीच्या चौकटीवर काचेच्या छोट्या वाटीत खडे, मीठ व हळद मिक्स करून ठेवणे.
७. तुळशी वृंदावन अग्नेय दिशेला ठेवणे. ते शक्य नसल्यास ईशान्येला ठेवणे तुळस टवटवीत असावी. वास्तूवरचे संकट तुळस स्वतःवर घेते, अशी पूर्वापार मान्यता आहे. तुळशी जवळ सायंकाळी तुपाचा दिवा आवश्य लावावा.
८. दीर्घ व सकारात्मक मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी नियमित पहाटे अमृत वेळेत उठायची सवय ठेवावी.
९. वास्तूमध्ये बनणारे अन्नपदार्थ अजिबात वाया जाऊ देऊ नये. भुकेपेक्षा चार घास कमीच खावे.
१०. देवघराची नियमित पूजा तसेच साफसफाई ठेवावी. देवघरात देखील नियमित धुपारती करावी.
११. मुख्य दरवाजा बाहेर चपला अथवा डस्टबिन उघडे ठेवू नये. घरामध्ये जळमटे नसावीत. मुख्यतः प्रवेशद्वार हे स्वच्छ ठेवावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!