नाशिक – कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांचे आरोग्य हित जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व युवक पदाधिकारी हे “घरबसल्या गणेश मूर्ती दान करा व कोरोना टाळा” हा उपक्रम राबवित आहे.
कोरोना विषाणूमुळे गणेश भक्तांचा हिरमोड झाला व यंदा सर्वांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील विसर्जन स्थळी गर्दी होऊन कोरोना बाधितांची संख्या वाढू नये. याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवार, (दि.१) ” घरबसल्या गणेश मूर्ती दान करा कोरोना टाळा” असा उपक्रम राबविण्यात येत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिककरांच्या घरी जाऊन गणेश मूर्तीचे संकलन करणार आहे. घरबसल्या गणेश मूर्ती दान करण्यासाठी विधानसभा व विभागनिहाय पदाधिकारी नेमण्यात आले आहे. संबधित विधानसभा व विभाग पदाधिकारी संकलित केलेल्या गणेश मूर्ती नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करून विसर्जन करण्यात येणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. घरबसल्या गणेश मूर्ती दान करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन खैरे यांनी केले आहे.
पूर्व विधानसभा – राहुल तुपे – ९६२३१८५०५०, मध्य विधानसभा – जय कोतवाल -८८८८६२०९९९, पश्चिम विधानसभा – बाळा निगळ – ९९२२५७८७७७, नाशिकरोड विभाग – सत्यम पोतदार – ७७७५८३७८९९, पंचवटी विभाग – मितेश राठोड – ८१८०००१२२१, सिडको विभाग – मुकेश शेवाळे – ९८९००२७२९९, सातपूर विभाग – निलेश भंदुरे-८८८८७८७७७२.