नाशिक – नाशिक मधील झाकीर हुसेन रुग्णालयात झालेली ऑक्सिजन गॅस गळतीची घटना दुर्दैवी आहे. याबाबत खा.डॉ.भारती पवार व आ.सीमा हिरे, नाशिक मनपा भाजप गटनेते जगदीश पाटील, डॉ.रावते यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घडलेल्या घटनेची डॉक्टरांकडून माहिती घेतली. मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्यांवर त्वरीत कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले.