भोपाळ – येथील एका छोट्याशा खेड्यातील शिक्षकाने आपल्यातील कौशल्य आणि ज्ञानाच्या जोरावर एक लघुग्रह शोधला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मोथापुरा या छोट्याशा गावात राहणारे विज्ञान शिक्षक नरेंद्र कर्मा यांनी एक छोटासा ग्रह शोधल्याचा दावा केला आहे.
सरकारने आयोजित केलेल्या लघुग्रह शोध कार्यक्रमात नरेंद्र कर्मा नागरिक म्हणून सहभागी झाले होते. आता या ग्रहाची तपासणी केली जाणार आहे, त्यानंतर त्यास नाव दिले जाणार आहे. नरेंद्र कर्मा हे एका विज्ञान क्लबचे संयोजकही आहेत. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय शोध सहयोगांतर्गत नासा अंतराळ एजन्सीच्या लघुग्रह शोध कार्यक्रमात त्यांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. तेथे त्यांनी ४५ दिवसांच्या लघुग्रह शोधासाठीचे प्रशिक्षण घेतले. यानंतर, त्यांनी अॅस्ट्रोनोमिका सॉफ्टवेअरवर काम करणे देखील शिकले आहे.
नरेंद्र कर्मा उल्कापिंडांच्या धोक्यांपासून पृथ्वीला इशारा देण्याचे काम करीत आहेत. ते म्हणतात की, गुरुत्वाकर्षणामुळे उल्का पृथ्वीच्या अगदी जवळ आले आहेत, त्यांना पाहणे फार महत्वाचे आहे. कधीकधी अशी उल्का देह पृथ्वीवर आपटून महाविनाशला आमंत्रण देऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.