नवी दिल्ली ः ग्रामविकास मंत्रालयामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाशी निगडित राष्ट्रीय स्तरावरील स्वायत्त संस्था राष्ट्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज संस्थेमध्ये (एनआयआरडीपीआर) ७२ पदांसाठी अर्ज मागवण्याची मुदत समाप्त होत आहे. या पदांसाठी दिव्यांग आणि आर्थिक मागासवर्गीयांना अर्ज करण्याची मुदत आज (९ मार्च) समाप्त होत आहे. या पदांसाठी कंत्राटी भरती होणार आहे. कंत्राटी कर्मचा-यांचा आधी एक वर्षाचा काळ असेल. प्रकल्प सुरू ठेवणे आणि संस्थेच्या निर्णयाच्या आधारावर करारवाढ होऊ शकेल.
एनआयआयडीपीआरच्या जाहिरातीत (सं. १६/२०२०) च्यानुसार २५० यंग फेलो, २५० क्लस्टर रिसोर्स पर्सन आणि १० राज्य समन्वयक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. नंतर संस्थेतर्फे घोषित केलेल्या रिक्त पदांमध्ये इडब्ल्यूएस आणि पीडब्ल्यूडीच्या उमेदवारांच्या आरक्षित ७२ जागांच्या अर्जांची मुदतही वाढवण्यात आली होती. इतर उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ डिसेंबर २०२०मध्येच संपली होती.
असा करावा अर्ज
एनआयआरडीपीआरच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार एनआयआरडीपीआरचं कार्यालयीन संकेतस्थळ career.nirdpr.in वर
उपलब्ध अर्ज भरू शकतात.
क्लस्टर रिसोर्स पर्सन पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त मंडळामधून १२ वी किंवा समकक्ष योग्यतेची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. त्याला संबंधित कामाचा पाच वर्षांचा अनुभव असावा. तसंच १ नोव्हेंबर २०२० पर्यंत त्याचं वय २५ वर्षांहून कमी आणि ४० वर्षांपेक्षा अधिक नसावं. त्याचप्रमाणे स्टेट प्रोग्राम कोऑर्डिनेटर्स पदांसाठी सोशल सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी असावी. उमेदवारांचं वय १ नोव्हेंबर २०२० पर्यंत ३० वर्षांहून कमी आणि ५० वर्षांहून अधिक नसावं. यंग फेलो पदांसाठी सोशल सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. वय २१ वर्षांहून कमी आणि ३० वर्षांहून अधिक नसावं.