नाशिक – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यातील सर्व ग्रामीण खेडे गावातील दिव्यांग व्यक्ती साठी ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग व्यक्तीला रोजगार मिळणार आहे. पुणे येथील दिव्यांग आयुक्तालय यांनी ८ मे २०२० रोजी आदेश काढला आहे. तरी सर्व दिव्यांग व्यक्तीने आपआपल्या गावातील किंवा रोजगार सेवकाकडे दिव्यांग नोंदणी करून जॉब कार्ड तयार करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती आर्की.अश्विनी अनिलकुमार आहेर यांनी केले आहे.
आहेर म्हणाले की, रोजगार हमी योजनेचा एक दिवसाचे रोज १३८ रुपये प्रमाणे एका वर्षात किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून मिळणार आहे. १३८ X १०० = १३८०० रुपये एका वर्षाला दिव्यांगाना याचा लाभ मिळेल. तरी दिव्यांग व्यक्तीने आपआपल्या गावातील ग्रामसेवक किंवा रोजगार सेवकाकडे त्वरित नोंदणी करून घ्यावी. तसेच आपल्या गावातील ग्रामसेवक व ग्राम रोजगार सेवकाकडून अधिक माहिती घ्यावी.