मुंबई – ग्रामपंचायतींचया निवडणुकीत सरपंचपदासाठी थेट लिलाव करण्यात आल्याच्या घटना राज्यात घडल्यानंतर त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात अशा घटना घडलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करावी आणि त्याचा अहवाल आयोगाला सादर करावा असे स्पष्ट निर्देशच निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्व निवडणुका अतिशय पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. तसेच, या अहवालावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अभिप्रायही नोंदवावा, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.