दिंडोरी – तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ज्या ग्रामपंचायतीचे निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येत बिनविरोध केल्यास एक महिन्याच्या आत गावाचा विकासासाठी आमदार निधीतून पाच हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाला २५ लाख रुपये व ५ हजाराच्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावांना ५० लाख रुपयांचा विकास निधी गाव मागेल त्या कामासाठी देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिली.
तालुक्याचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर गावांत एकोपा असावा.व गावांचाही विकास करून घेण्यासाठी गाव पातळीवर ग्रामस्थांनी पक्ष भेद विसरून, गट तट विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास करण्यास मदत होईल. दिंडोरी तालुक्यात येत्या १५ जानेवारीला एकूण ६० ग्रामपंचायत ची निवडणूक होत आहे. ४ जानेवारीला माघारी असून तत्पूर्वी ज्या ग्रामपंचायत च्या निवडणुका आहेत त्या ग्रामपंचयात च्या ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व जागा बिनविरोध कराव्यात.आणि ज्या ग्रामपंचयात च्या सर्व जागा बिनविरोध होतील त्या गावाला एक महिन्याच्या आत २५ लाख व ५ हजार लोकसंख्येच्या पुढे असलेल्या गावाला ५० लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येईल, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.