पिंपळगाव बसवंत – राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. कोव्हीडमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीतील सर्व निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने इतक्या मोठ्या निवडणुकीचा प्रोग्राम पहिल्यांदा लागला असावा.
खरे तर ग्रामपंचायत निवडणुका गावस्तरावर पॅनल तयार करुन घेतल्या जायच्या. परंतु, आता राज्यातील पक्षांनी या निवडणुकांकडे लक्ष देण्याचे काम चालू केले आहे. यात मनसेने राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका लढविण्याचे ठरविल्यानंतर शिवसेनादेखील आक्रमक होवून बैठकांवर बैठका सुरु झाल्या. त्यात आता भाजपा पण जोर धरु लागली आहे. यामुळे निवडणुकांत रंगत येणार असली तरी गावस्तरावर हे होणे शक्य नाही. कारण या निवडणुकीत पॅनल निर्माण करावा लागतो. गावातील राजकारण हे गटातटाचे असते आणि हे सर्व पक्ष इच्छुक असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र द्यावे व ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुका पक्ष चिन्हांवर हाव्यात जेणेकरुन पक्षांकडून कोणी उमेदवार इच्छूक होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी केली आहे.