मुंबई – गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या व डेड रेंट दरात दीडपट वाढ करण्याच्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे वाढीव दर १ जुलै २०२१ पासून लागू होतील. गौण खनिजाच्या स्वामित्वधनाचे दर खालीलप्रमाणे असतील.
-
बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेला चुना रुपये 600/- प्रति ब्रास.
-
उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड मग त्याचा आकार केवढाही असो आणि दगडाची भूकटी रुपये 600/- प्रति ब्रास.
-
बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगड (लॅटराईट स्टोन) रुपये 150/- प्रति ब्रास.
-
(क) उत्खननाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले गोटे, बारीक खडी, मुरूम, कंकर रु. 600/- प्रति ब्रास.
(ख) केवळ बॉलमिल्सच्या प्रयोजनाकरीता वापरण्यात येणार चॅल्सेडोनी खडे रु. 3000/- प्रति ब्रास.
(ग) पुढील प्रयोजनाकरिता वापरण्यात न येणारी सर्वसामान्य वाळू.
सिरामिक किंवा मृतिकाशिल्पे, धातुशास्त्रीय, दृष्टिविषयक, कोळसा खाणीमध्ये साठवून ठेवण्याच्या, सिल्व्हीक्रेट सिमेंट तयार करण्यासाठी, मातीची भांडी व काच सामान तयार करण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता रुपये 1200/- प्रति ब्रास आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता रुपये 600/- प्रति ब्रास.
-
कौले (मंगलोरी किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनाची) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी चिकणमाती रुपये 600/- प्रति ब्रास.
-
अंतर्गत बंधारे, रस्ते, लोहमार्ग व इमारती यांचे बांधकाम करताना भरणा करण्यासाठी/भूपृष्ठ सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी माती रुपये 600/- प्रति ब्रास.
-
बांधकामाचे साहित्य म्हणून वापरण्यात येते, त्यावेळी पाटीचा दगड किंवा नरम खडक रुपये 600/- प्रति ब्रास.
8.विटा तयार करण्याच्या व इतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणारी साधी माती, गाळ व सर्व प्रकारची चिकणमाती, इत्यादी रुपये 240/- प्रति ब्रास.
-
फुलरची माती किंवा बेटोनाईट रुपये 1500/- प्रति ब्रास.
-
सजावटीच्या प्रयोजनासाठी वापरावयाचे इतर सर्व प्रकारचे दगड (ग्रॅनाईट वगळून) रुपये 3000/- प्रति ब्रास
-
इतर सर्व गौण खनिज (ग्रॅनाईट वगळून व केंद्र शासनाने दिनांक 10/02/2015 अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) रुपये 600/- प्रति ब्रास.
सर्व गौण खनिजे (ग्रॅनाईट वगळून व केंद्र शासनाने दिनांक 10/02/2015 अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) रु. 9,000 प्रति हेक्टर किंवा त्याच्या भागासाठी ठोकबंद भाडे आकारण्यात येईल.