लासलगाव – शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी रेल्वे गाड्या तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीत पाटील म्हणाले की, हजारो प्रवासी वर्षानुवर्ष लासलगांव ते नाशिक, देवळाली इगतपुरी मुंबई येथे रोज, गोदावरी एक्सप्रेस या प्रवासी गाडीने ये-जा करीत असता. पण २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन झाले व सर्व रेल्वे बंद झाल्या, त्यामुळे सर्व चाकरमानी हे घरीच बसून आहे. आता नाशिक व मुंबई येथे सर्व कार्यालये , कोर्ट, शिक्षण संस्था, दुकाने व इतर कार्यालयेे सुरू झाले आहे. कामावर येण्या-जाण्यासाठी रेल्वे हा एकमेव पर्याय आहे. दुसर्या साधनांनी जाण्यासाठी आर्थिक,शारिरीक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
गोदावरी एक्सप्रेस ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत धावणारी गाडी असून ती सुरू झाल्याने सर्वाधिक प्रवाशांना फायदा होईल. तसेच गोदावरी एक्सप्रेस महिला, मुली व इतर सर्वच प्रवाशांना वेळेत घरी येणे देखील शक्य होते त्यामुळे ही गाडी तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.
बहुतेक चाकरमानी हे हातवर काम करणारे असून त्यांचा परिवाराच उदरनिर्वाह त्यांच्याच पगारावर होत असतो. पण रोज ये-जा करण्यासाठी साधन नसल्यामुळे बहुतेकांच्या नोकर्या गेल्या आहे त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे ते हालाखीचे जीवन जगत आहे. सर्व सामान्य नागरीकांसाठी संजिवनी ठरलेल्या ईगतपुरी-मनमाड शटल,देवळाली-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-मुंबई पॅसेंजर सुध्दा प्रवाश्यांसाठी सुरू करणे आवश्यक आहे. सामान्य जनतेला कमी भाड्यात पोहचविणार्या रेल्वे गाड्या तात्काळ सुरू करून नागरिकांना न्याय द्यावा.
यावेळी त्यांनी खासदार गोडसे यांना सदर प्रश्न संसदिय हिवाळी अधिवेशनात मांडून रेल्वे तत्काळ सुरु करण्यात येऊन नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना न्याय द्यावा ही विनंती केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले की, मी उद्याच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी समक्ष भेटून तात्काळ प्रश्न मार्गी लावणार आहे.या भेटीप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण दादा पाळदे ,लामको संचालक प्रवीण कदम ,रेल्वे प्रवासी संघटना लासलगावचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशुतोष सूर्यवंशी, युवा सेनेचे मंदार खानापूरकर ,गणेश कुलकर्णी , योगेश नाबरा ,समर्थ पाटील आदी उपस्थित होते.