नाशिक – गेल्या २४ तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून सध्या २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्या देवी होळकर पुलाखालून सध्या ३००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याला सध्या पाणी लागले आहे. त्यामुळे रामकुंड परिसरात सध्या दक्षता बाळगली जात आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर चांगला असून पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.