बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गोदावरीचे प्रदूषण भोवले; ८८ जणांवर गुन्हा दाखल

by India Darpan
ऑगस्ट 11, 2020 | 9:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र


उपायुक्त रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची ऑनलाईन बैठक
नाशिक – गोदावरी नदी प्रदूषण करणाऱ्यांवर मुंबई कायद्यानुसार गेल्या सहा महिन्यात ८८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याच कायद्याअंतर्गत २०१६ पासून आजपर्यंत एकूण ३ हजार ८५६ गुन्ह्यांच्या नोंदीनुसार ८२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. या अनुषंगाने गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत ही माहिती सादर करण्यात आली. उपायुक्त रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत पोलिस उप आयुक्त अमोल तांबे यांनी ही माहिती दिली.
नाशिकरोड येथील पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदूषण विरहीत करणे, वालदेवी नदीमधील होणाऱ्या प्रदूषणावर जिल्हा परिषद व महानगरपालिका यांनी मिळून केलेल्या उपाययोजना व कार्यवाही केलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सिव्हेज ट्रिटमेंट प्लँट (एसटीपी) तयार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असल्याचेही मनपाचे कार्यकारी अभियंता वंजारी यांनी सांगितले.
एमआयडीसीमधील कंपन्याचे दूषित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदीप्रदूषणात भर पडत असल्याने अशा कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पिंपळगाव खांब व तपोवन खालच्या भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पिंपळगाव खांब येथील जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादीत करण्यात आल्याचे उप जिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. त्यानुसार संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात आला. बैठकीस एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता दुष्यंत उइके, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्मार्ट सिटीत योगदान द्यायचे आहे? मग ही बातमी नक्की वाचा

Next Post

इंद्रकुंड देवस्थानाच्या प्रांगणात शितळादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना

Next Post
IMG 20200810 WA0227

इंद्रकुंड देवस्थानाच्या प्रांगणात शितळादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025

स्वस्त धान्य दुकानदाराचा रेशनवर डल्ला…८४ क्विंटल धान्य केले परस्पर हडप

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011