अक्षय कोठावदे,नाशिक
थंड हवेचं नंदनवन म्हणून चांदोरीचा उल्लेख होतो. नाशिकपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेले चांदोरी हे गाव जिल्ह्यातील व राज्यातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. या गावाच्या आसपास प्राचीन,मंदिर गोदाघाट सांस्कृतिक मंदिर आदि क्षेत्र आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी, पर्यटक, छायाचित्रकार हे नेहमी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यासाठी येत असतात. विेशेष म्हणजे हिवाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी असते. येथील प्राचीन मंदिर गाव व परिसर पर्यटकांना आकर्षित करते. आता पर्यटक या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणची माहिती घेऊन इतरांनाही सांगतात. येथे छायाचित्रकार आपला छंद कला जोपासण्यासाठी येत असतात. हिवाळ्यात पडणारे धुके, संथ वाहणारी नदी, पक्षांचा किलबिलाट यामुळे वातावरण अधिकच रमणीय होऊन जाते, सूर्य जसा पूर्वेकडून पश्चिमेकडे येतो तसतशी मंदिरांची शिल्पशैली बदलत गेलेली दिसते. पर्यटक ,निसर्गप्रेमी यासाठी हे गोदाकाठ नक्कीच एक चांगले डेस्टिनेशन आहे.
असे पडले चांदोरी हे नाव
ज्या ठिकाणी गोदावरी नदी चंद्राकार प्रवाह धारण करते ते ठिकाण म्हणजे चांदोरी चंद्रावती चा अपभ्रंश होऊन चांदोरी हे नाव पडले.
तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा