मुंबई – २०२० या वर्षाबरोबरच संपत असलेल्या दशकात बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांनी तिकीटबारीवर धमाल केली. आज या १० वर्षांतील १० अश्या चित्रपटांची थोडक्यात माहिती देणार आहोत ज्यांनी कमाईचे अनेक विक्रम तोडून नवे विक्रम स्थापन केले.
१. बाहुबली -२ : या यादीमध्ये अर्थातच बाहुबली २ चा पहिला क्रमांक लागतो. सुपरस्टार प्रभासच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ५१० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला आहे. एस. एस. राजमौली यांचा हा चित्रपट इतका सुप्रसिद्ध झाला होता की याने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.
२. दंगल: अमीर खानचा दंगल चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर ३७४ कोटी रुपये कमावले.
३. टायगर जिंदा है: सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. चित्रपटाने ३४० कोटी रुपये कमाई केली होती. सलमानच्या करिअर मधला हा सर्वांत मोठा चित्रपट असल्याचे सांगितले जाते.
४: पिके: अमीर खानच्या पी.के. चित्रपटाने ३३७ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट धार्मिक विषयांना हात घातल्यामुळे विवादास्पदसुद्धा राहिला होता. अनुष्का शर्मा हिची यात मुख्य भूमिका होती.
५. संजू: रणवीर कपूर चा ‘संजू’ चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे. चित्रपटाने ३३४ कोटी रुपये कमाई केली. संजय दत्त याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता ज्यात रणबीर ने संजय ची भूमिका केली होती.
६. बजरंगी भाईजान: सहाव्या क्रमांकावर सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ आहे. भाईजानने ३१५ कोटी रुपयांची कमाई केली.
७. सुलतान: सलमान खानचा ‘सुलतान’ या यादीत सातव्या स्थानी आहे. यातही अनुष्का शर्माची भूमिका प्रमुख होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
८. वॉर: हृतिक रोषन आणि टायगर श्रॉफ यांचा चित्रपट वॉर या यादीत आठव्या स्थानी आहे. चित्रपटाने २९२ कोटींचा व्यवसाय केला. हृतिक आणि टायगर यांची एकत्र भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट होता.
९. पद्मावत: संजय लीला भाल्साली यांचा पद्मावत चित्रपट या यादीत नवव्या स्थानी आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच खूप विवाद निर्माण झाला असला तरीसुद्धा चित्रपटाने २८२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दीपिका पदुकोन हिची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात शहीद कपूर आणि रणवीर सिंग यांनी देखील प्रमुख भूमिका केल्या होत्या.
१०. तानाजी: द अनसंग वॉरियर: अजय देवगनचा तानाजी चित्रपट दहाव्या स्थानी आहे. बॉक्स ऑफिस वर २६९ कोटी रुपयांची कमाई करत तानाजीने मोठे यश मिळवले. सैफ अली खान याची सुद्धा यात महत्वाची भूमिका होती.