नाशिक – गेल्या एक वर्षामध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्व क्षेत्रात अपयशी ठरले असे सांगत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले या सरकारने महाराष्ट्राला २५ वर्षे मागे घेऊन आले. हे सरकार अकार्यक्षम आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी बघितले नाही असे हे सरकार आहे. कोरोना संकट काळातही हे सरकार कमी पडले. वर्षभरात या सरकारने शेतक-यांची फसवणूक केली. वीजबिल कोणताही निर्णय घेतला नाही. महाराष्ट्राचे उद्योग बाहेर घेऊन जात असल्याचे हे सरकार आरोप करत आहेत. पण, त्याची कारणे शोधली पाहिजे. हे सरकारचे अपयश आहे. हे सरकार नाकर्ते असल्याचेही नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, भाजपचे महानगराध्यक्ष गिरीश पालवे यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी माधव भंडारी यांनी पत्रकाराने विचारलेल्या विविध प्रश्नाचेही उत्तर दिले.