नाशिक – अब बस भी करो मोदी सरकार, बहोत हुई महंगाई की मार अशा घोषणा देत केंद्र सरकारने सातत्याने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा दिल्या. यावेळी दरवाढीचा निषेध नोंदवत संतापही व्यक्त केला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले. नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्षा सुषमा पगारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ डिसेंबर पासून ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या अनुदानित, व्यावसायिक दरात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. यामुळे सर्व सामान्य कुटुंबातील महिला आर्थिक संकटात सापडल्या आहेत. अवघ्या एका महिन्यात दोन वेळा किंमतीत भरमसाठ वाढ केलेली आहे. त्यामुळे आम्ही या दरवाढीचा निषेध करतो. केंद्र सरकारने दखल घेऊन सिलेंडरच्या किंमती कमी कराव्यात व सर्व सामान्य कुटुंबांचा विचार करावा. अन्यथा यापुढे महिला रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील असे आव्हान दिले असे म्हटले आहे, निवेदन देतांना विधानसभा अध्यक्ष पुष्पा राठोड, रंजना गांगुर्डे, विभागीय अध्यक्ष सरिता पगारे, संगिता गांगुर्डे, शहर पदाधिकारी मिनाक्षी गायकवाड, सुरेखा पठाडे, सुजाता कोल्हे, संगिता भामरे, सुजाता गाढवे, योगिता आहेर, सुनिता थिगळे, स्वाती बिडला, मनिषा पवार, दिक्षा दोंदे, मंगला मानकर, सलमा शेख, शकिला शेख, संगिता चौधरी आदि महिला उपस्थित होत्या. नाशिक लोकसभा खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन गॅस दरवाढी बाबत केंद्र सरकार कडे पाठपुरावा करून गॅस दरवाढ मागे घ्यावी असे निवेदन दिले.
सद्यस्थितीत घरगुती सिलिंडर ची किंमत खालील प्रमाणे
दिल्ली– ६९४ रूपये
मुंबई — ६९४ रूपये
कलकत्ता– ७२० रूपये
चेन्नई ७१० रूपये
व्यावसायिक सिलिंडर
दिल्ली १३३२.५० रूपये
मुंबई १२८०.५० रूपये
कलकत्ता१३८७.५० रुपये
चेन्नई १४४६.५० रूपये
याशिवाय ५ किलोच्या सिलिंडर च्या किंमतीत १८ रूपये वाढ झालेली आहे.