मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची १५ दिवसांत सीबीआयने चौकशी करुन प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. त्यामुळे आता परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी होणार आहे. सिंह यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप केला होता.
सिंह यांनी अगोदर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे आरोप केले होते. त्यामुळे खळबळ निर्माण झाली होती. विरोधी पक्षांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी सुध्दा केली. तर राष्ट्रवादीने राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला. परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांनी सुध्दा जनहित याचिका दाखल केल्या होत्या. तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढल्या आहे.