मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनीच सोशल मीडियावर एक ट्विट करत दिली आहे. या ट्विट मध्ये त्यांनी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे. त्यात काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. आपली प्रकृती उत्तम असून, लवकरच कोरोनावर मात करुन आपण सेवेत हजर होवू असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.