नवी दिल्ली – गृह कर्जावरील व्याजदरात सध्या लक्षणीय घट झाली असून आपण घर विकत घेण्याचा विचार करीत असाल तर ही चांगली संधी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या काही राज्यात मुद्रांक शुल्काचे दरही खाली आले आहेत.
नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडियाने ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जासाठी ६.७ टक्के आणि ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जासाठी ६.७५ टक्के व्याजदर कमी केले आहेत. कोटक महिंद्रा बँक देखील होम लोनवर अतिशय आकर्षक व्याज दर देत आहे. बाजारात तुलनेने कमी व्याज दर देणाऱ्या काही बँक आणि गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या गृह कर्जावरील व्याजदराबद्दल जाणून घेऊ या…
कोटक महिंद्रा बँक
पात्र पतधारकांना गृह कर्जावर बँक ६.६५ टक्के व्याज दर आकारत आहे. २० वर्षांच्या कालावधीसाठी ७५ लाख रुपयांची कर्जाची रक्कम आणि ईएमआय ५६ हजार ५८२ रुपये असेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया
पात्र कर्जदारांना गृह कर्जावर बँक ६.७० टक्के व्याज दर आकारत आहे. २० वर्षांच्या कालावधीसाठी ७५ लाख रुपयांची कर्जाची रक्कम आणि ईएमआय ५६ हजार ८०५ रुपये असेल.
आयसीआयसीआय बँक
पात्र पतधारकांना गृह कर्जावर बँक ६.७५ टक्के व्याज दर आकारत आहे. कर्जाची रक्कम ७५ लाख आणि २० वर्षांच्या कालावधीसाठी ईएमआय ५७ हजार २७ रुपये असेल.
पंजाब नॅशनल बँक
पात्र कर्जदारांना गृह कर्जावर बँक ६.८० टक्के व्याज दर आकारत आहे. कर्जाची रक्कम ७५ लाख आणि ईएमआय २० वर्षांच्या कालावधीसाठी ५७ हजार २५० रुपये असेल.
बँक ऑफ बडोदा
पात्र कर्जदारांना गृह कर्जावर बँक ६.८५ टक्के व्याज दर आकारत आहे. कर्जाची रक्कम ७५ लाख आणि ईएमआय २० वर्षांच्या कालावधीसाठी ५७ हजार ४७४ रुपये असेल.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
पात्र कर्जदारांना गृह कर्जावर बँक ६.८५ टक्के व्याज दर आकारत आहे. कर्जाची रक्कम ७५ लाख आणि ईएमआय २० वर्षांच्या कालावधीसाठी ५७ हजार ४७४ रुपये असेल.
बँक ऑफ इंडिया
पात्र कर्जदारांना गृह कर्जावर बँक 6.85 टक्के व्याज दर आकारत आहे. कर्जाची रक्कम 75 लाख आणि ईएमआय 20 वर्षांच्या कालावधीसाठी 57,474 रुपये असेल.
बजाज फायनान्स
पात्र कर्जदारांकडून गृह कर्जावर बँक ६.९० टक्के व्याज दर आकारत आहे. कर्जाची रक्कम ७५ लाख आणि ईएमआय २० वर्षांच्या कालावधीसाठी ५७ हजार ६९८ रुपये असेल.
एलआयसी हाउसिंग फायनान्स
पात्र कर्जदारांकडून गृह कर्जावर बँक ६.९० टक्के व्याज दर आकारत आहे. कर्जाची रक्कम ७५ लाख आणि ईएमआय २० वर्षांच्या कालावधीसाठी ५७ हजार ६९८ रुपये असेल.
आयडीबीआय बँक
पात्र कर्जदारांकडून गृह कर्जावर बँक ६.९० टक्के व्याज दर आकारत आहे. कर्जाची रक्कम ७५ लाख आणि ईएमआय २० वर्षांच्या कालावधीसाठी ५७ हजार ६९८ रुपये असेल.
अॅक्सिस बँक
पात्र कर्जदारांकडून गृह कर्जावर बँक ६.९० टक्के व्याज दर आकारत आहे. कर्जाची रक्कम ७५ लाख आणि ईएमआय २० वर्षांच्या कालावधीसाठी ५७ हजार ६९८ रुपये असेल.
कॅनरा बँक
पात्र कर्जदारांकडून गृह कर्जावर बँक ६.९० टक्के व्याज दर देत आहे. कर्जाची रक्कम ७५ लाख आणि ईएमआय २० वर्षांच्या कालावधीसाठी ५७ हजार ६९८ रुपये असेल.