नवी दिल्ली ः राज्यसभेमधून निवृत्त झालेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. गुलाम नबी आझाद यांचे चार दशकांहून अधिक काळाचे राजकीय करिअर सोमवारी संपुष्टात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यसभेत जे काही पहायला मिळाले त्यावरून बोलले जात आहे की, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र गुलाम नबी आझाद यांनी एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांवरही त्यांनी भाष्य केले आहे.
काश्मीरमध्ये जेव्हा काळा बर्फ पडेल तेव्हा…
भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या प्रश्नावर गुलाम नबी आझाद यांनी खुलासा केला की, काश्मीरमध्ये जेव्हा काळा बर्फ पडेल, तेव्हा मी भाजपमध्ये प्रवेश करेल. भाजपच नव्हे, मी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतो. जे लोक या अफवा पसरवत आहेत, ते मला ओळखत नाहीत.
वाजपेयी जेव्हा माफी मागतात…
भाजप प्रवेशाची अटकळ फेटाळत त्यांनी एक उदाहरण सांगितले. जेव्हा राजमाता शिंदे विरोधी पक्षाच्या उपनेत्या होत्या, तेव्हा त्यांनी उठून माझ्यावर आरोप केले होते. तेव्हा मी उठलो आणि म्हणालो, की मी आरोपांना गंभीरतेनं घेतो, सरकारतर्फे मी एका समितीचा सल्ला देतो, ज्याचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी असतील. त्यामध्ये राजमाता शिंदे आणि लालकृष्ण अ़डवाणी सदस्य असतील. त्यांनी चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल द्यावा. ते जी कोणतीही शिक्षा देण्याचा सल्ला देतील, ती मी स्वीकारेल. आपले नाव ऐकताच अटल बिहारी वाजपेयी माझ्याजवळ आले आणि असे का करत आहात. जेव्हा मी त्यांना सांगितले तर त्यांनी उठून सांगितले की, मी सभागृह आणि गुलाम नबी आझाद यांची क्षमा मागतो. बहुतेक राजमाता शिंदे त्यांना ओळखत नाही, पण मी त्यांना ओळखतो.
पंतप्रधानांशी जिव्हाळ्याचे संबंध
पंतप्रधानांच्या संबंधांबाबत त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, की आम्ही एकमेकांना ९० च्या दशकापासून ओळखतो. आम्ही आमच्या पक्षांचे सरचिटणीस होतो. त्या वेळी आम्ही टीव्हीच्या चर्चांमध्ये सहभागी होत होतो. चर्चेदरम्यान आम्ही वैचारिकदृष्ट्या एकमेकांशी भांडत होतो. परंतु आम्ही लवकर पोहोचल्यास चहासोबत गप्पाही मारत असू. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक, पंतप्रधानांची बैठक, गृहमंत्र्यांच्या बैठकीत आम्ही एकमेकांना जास्त ओळखू लागलो. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मी आरोग्यमंत्री होतो. तेव्हा आम्ही दहा-बारा दिवसांत विविध मुद्द्यांवर चर्चा करत असत.
पंतप्रधान भावूक का झाले
राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी भावूक का झाले यावरही त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले, की २००६ मध्ये एका गुजराती पर्यटक बसवर काश्मीरवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यांच्याशी बोलताना मी भावूक होऊन रडू लागलो होतो. पंतप्रधान सांगत होते की, एक व्यक्ती निवृत्त होत असून तो एक चांगला नागरिक आहे. ते त्या गोष्टीला पूर्ण करू शकले नाही कारण ते भावूक झाले होते.जेव्हा मी ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी उठलो तर मीसुद्धा ती गोष्ट पूर्ण करू शकलो नाही, कारण १४ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेमधून मी बाहेर आलो होतो.