नवी दिल्ली ः काँग्रेसचे राज्यसभेतील सदस्य गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाल मंगळवारी संपुष्टात आला. राज्यसभेतून निवृत्त होणार्या चार खासदारांबद्दल बोलताना सर्वांनीच कौतुक केलं. परंतु विशेष करून गुलामनबी आझाद यांनी केलेल्या कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. काही वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान गुजरातमधील भाविकांची सुटका करण्यासाठी गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यांचं कौतुक करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
गुलाम नबी आझाद हे देशासह संसद सभागृहातील प्रत्येकाची चिंता करतात त्यांच्या कार्यामुळे मी प्रभावित झालो, असं पंतप्रधान म्हणाले. राज्यसभेतील सदस्य खासदार शरद पवार यांनीही गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या. जम्मू-काश्मीरमधला एक व्यक्ती महाराष्ट्रातल्या वाशिमचं प्रतिनिधीत्व करून लोकांची मनं जिंकतो. त्यांचं कार्य नेहमीच लक्षात ठेवलं जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1359016232104591360