नाशिक – गांधी जयंती निमित्ताने गुरुगोविंदसिंग पब्लिक स्कूल अँन्ड ज्युनिअर काँलेज नाशिक या शाळेच्या प्राथमिक विभागाने आँनलाईन उपक्रम राबवुन महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमाअंतर्गत ‘पांढरा दिवस’ व ‘स्वच्छतेचे महत्त्व’ हे दोन उपक्रम राबविण्यात आले. इ.१ ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांनी पांढरा पोषाख परिधान करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल संस्थेच्या व्यवस्थापन समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदुरसिंग, प्राचार्या शिल्पा बोरीचा, प्राथमिक मुख्याधिपिका इंदू जयन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.