रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गुन्ह्यांचा निकाल लागणार पटापट; राज्यातील डीएनए प्रयोगशाळा सक्षम होणार

by India Darpan
सप्टेंबर 8, 2020 | 1:13 pm
in राज्य
0

मुंबई – निर्भया निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत राज्याला २०१९-२० वर्षात २६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या माध्यमातून राज्यातील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचा डी.एन.ए. विभाग अधिक सक्षम करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

केंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेअंतर्गत राज्यातील न्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आठ विभागीय व पाच लघु प्रयोगशाळा कार्यरत आहेत. यातील सहाच प्रयोगशाळांमध्ये डी.एन.ए. विभाग कार्यरत आहे. उर्वरित कोल्हापूर व नांदेड येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत येत्या दोन महिन्यात डी.एन.ए.विभाग कार्यान्वित करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेला ११ कोटी २६ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तसेच मुंबई, नागपूर व पुणे येथील प्रयोगशाळांमध्ये महिला व बालकांवरील अत्याचार प्रकरणांच्या डी.एन.ए. विश्लेषणाकरिता स्वतंत्र डी.एन.ए. विभाग कार्यान्वित करण्यासाठी उर्वरित १५ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. हे विभाग देखील येत्या दोन महिन्यात कार्यान्वित होतील.

निर्भया योजनेद्वारे महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सक्षम करण्यात येत आहेत. जेणेकरून तांत्रिकदृष्ट्या पोलिस तपासात कोणतीही उणीव राहणार नाही, अशी माहितीही गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वळण बंधाऱ्यामुळे धरणांचा स्त्रोत घटला; पेठ तालुक्यातील सहाच धरणे भरली

Next Post

कला विषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

Next Post
DOA 750x375 1

कला विषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011